team jeevandeep 10/05/2025 mahatvachya-batmya Share
मागील तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील
संघर्ष विकोपाला गेला आहे. दोन्ही देशातील लष्करी थांबावा आणि तणाव निवळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर दोन्ही देशांनी तात्कळ शस्त्रसंधी करण्यासाठी तयार दर्शवली आहे. याबद्दलची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मागील दोन दिवसांपासून चांगलाच चिघळला होता. पाकिस्तानकडून रात्रीच्या वेळी भारतातील लष्करी आणि नागरी ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तर दिले गेले. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला होता. दोन्ही देशातील तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने हा संघर्ष थांबल्याचे जाहीर करण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर अखेर मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान हे दोघेही पूर्णपणे आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयार झाले आहेत. सारासार विचार आणि विद्वत्तेचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन", अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.