Visitors: 228178
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

पनवेलमध्ये मराठी कुटुंबाला घर रिकामी करण्यास दबाव - मनसेकडून खळखट्याक!

  team jeevandeep      28/01/2025      mahatvachya-batmya    Share


डोंबिवलीत सोसायटीत सत्यनारायण पूजा, हळदी कुंकु कार्यक्रमावरून मराठी- अमराठी भाषकांमध्ये वाद झाल्यानंतर आता पनवेलमध्येही मराठीवरून वाद झाल्याचे समोर आले आहे. खोलीचे करार संपल्यानंतरही घरात राहणाऱ्या एका मराठी कुटुंंबाला त्या सोसायटीच्या चेअरमनकडून शिविगाळ केल्याचा दावा या मराठी कुटुंबियांकडून केला जातोय. याप्रकरणी त्यांना स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून व्हिडिओद्वारे त्यांची हकिकतही मांडली आहे.

पनवेलमधील भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या कुंटुंबाला त्रास दिला जात असल्याचा आरोप गायकवाड कुटुंबाने केलाय. इथे हे कुटुंब भाड्याने राहत होतं. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर ते दुसऱ्या रुमची शोधाशोध करत असल्याने त्यांनी त्या संदर्भात घर मालकाला कळवलं होतं, त्यांचं मुल लहान असल्याने घरमालकाने त्यांना राहण्याची परवानगी दिली होती, तरीही या सोसयाटीच्या महिला चेअरमनकडून रुम सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला गेलाय. शिवाय भांडंण करुन मराठी माणसांची इथे राहण्याची लायकी नाही असं म्हणत शिविगाळ केली गेल्याचं गायकवाड कुटुंबाचं म्हणणं आहे.

या वादात गायकवाड यांना हृदयाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेची माहिती मिळताच मनसेने जाब विचारला, मनेसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष अदिती सोनार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मराठी माणसांवर होत असलेल्या अरेरावीचा जाब विचारला. त्यानंतर सोसायटीतल्या इतर मराठी रहिवाशांनीही याच स्वरुपाच्या तक्रारी केल्यात. परिणामी चेअरमन वसुंधरा शर्मा महिलेने सर्वांचीच माफी मागितली आहे व यापुढे एकाही मराठी कुटुंब किंवा भाडेकरू कुटुंबांना त्रास देणार नाही याची कबुली दिली आहे.

व्हिडिओत काय ऐकू येतंय?

“तुम्ही गेटच्या बाहेर जा, तुम्ही गेटच्या आतमध्ये नको, असं ती महिला म्हणत होती. मी पाच महिन्याच्या बाळाला घेऊन कुठे जाऊ?” असा पीडित महिलेने विचारला. तर, “दोन टक्क्यांचा मराठी माणूस, तुमची हिरानंदनीमध्ये राहण्याची लायकी असंही या महिला चेअरमनने म्हटलं. त्यांनी आतापर्यंत तीन ते चार मराठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे”, अशी माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली.

+