Visitors: 391031
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती

  team jeevandeep      04/03/2025      mahatvachya-batmya    Share


धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे.

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर चहूबाजूंनी कोंडीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. दोघांमध्ये सागर बंगल्यावर २५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली होती. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मात्र धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपविल्याची माहिती आहे.

विरोधक आणि महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपामुळे मी व्यथित झालो आहे, असे नमूद करून धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. चर्चेअंती राजीनामयासंदर्भातील निर्णय राखून ठेवल्याची माहिती आहे.दरम्यान, सागर बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून तडक निघून जाणे पसंत केले.

अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे सोमवारी दुपारी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. उभय नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर आणि राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा झाल्याचे कळते.

 

+