team jeevandeep 07/05/2025 mahatvachya-batmya Share
दि. ०७ (जिल्हा परिषद, ठाणे) –
महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्तापरिषद (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन - १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्हा परिषद, ठाणे यांनी संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत एक गौरवशाली यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज, दि. ०७ मे, २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना मंत्रीमंडळ सभागृह, मंत्रालय, मुंबई येथे प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत कार्यालयीन कार्यपद्धती, कार्यक्षमता, पारदर्शकता, नागरिकांशी संवाद, वेळेत सेवा देणे अशा विविध घटकांवर मूल्यांकन करण्यात आले. ९२.०० गुणांसह ठाणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव एकनाथ डवले, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार आदींसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे प्रभावी नेतृत्व आणि जिल्हा परिषदेची सातत्यपूर्ण मेहनतीने यश संपादन केले. असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले: "या यशाचे श्रेय जिल्हा परिषद ठाणेच्या प्रत्येक अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्याचे आहे. ‘१०० दिवस कृती कार्यक्रमा’त आम्ही प्रशासन गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख बनवण्यासाठी एकजूटीनं प्रयत्न केला. हे यश प्रेरणादायी असून, आगामी काळातही आम्ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत."
या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत राबविण्यात आलेले काही प्रमुख नाविन्यपूर्ण उपक्रम
'Door Step Delivery'
सर्व शासकीय कागदपत्र नागरिकांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी 'Door Step Delivery' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांत ४३१ ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित करण्यात आला असून २० दिवसात ३ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घर बसल्या शासकीय कागदपत्र घेण्याचा लाभ देण्यात आला आहे.
दिशा उपक्रम
ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्यात जास्त असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी दिशा उपक्रमातून ३१ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्या एआयच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. १० महिन्याच्या कालखंडात भाषा आणि गणित या विषयात अध्ययन स्तर दुप्पटीपेक्षा जास्त वाढविण्यात यश आले आहे. अभियान कालावधीमध्ये १३२८ शाळांमधील ७२४७३ विद्यार्थ्यांच्या १०,८६,०७३ इतक्या अध्ययन स्तर नोंदी करण्यात आल्या असून, पर्यवेक्षिय यंत्रणेच्या २५०० शाळा भेटीव्दारे अध्ययन स्तर पुर्नपडताळणी व मार्गदर्शन करण्यात आले. अध्ययन स्तर निश्चित करण्यात आलेल्या सर्व विदयार्थ्यांच्या Personalize Learning Improvement Plan करून पालक व शिक्षकांच्या मदतीने विविध कृतींच्या माध्यमातून विदयार्थ्यांचा अध्ययन स्तर समृध्द करण्यात आला. या उपक्रमाची दखल महाराष्ट्र शासन स्तरावर घेत निपूण महाराष्ट्र या उपक्रमात अंतर्भाव करण्यात आला आहे.
Work Management Software
जिल्हा परिषद कार्यान्वीत विविध योजना व कामांची आर्थिक/ भौतिक प्रगती पर्यवेक्षण व व्यवस्थापन करण्यात आले आहे. Dashboard च्या माध्यमातुन सध्या सन २०२३-२४ व २०२४-२५ मधील राज्य शासन निधी, DPDC, TSP, OTSP, MMRDA, डोंगरी विकास निधी, आमदार निधी, खासदार निधी प्राप्त निधी अंतर्गत Dashboard वर एकुण ४४६ लेखाशिर्ष व एकुण ३५६६ कामांची माहिती समाविष्ट करून कामकाजात पारदर्शकता आणण्यात आली.
ई ऑफिस
जिल्हा परिषद अंतर्गत ई ऑफिस मार्फत सर्व फाईल व टपाल डिजिटल फाईल करण्यात येत असून या फाईल चार स्तरांपेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे तसेच प्रत्येक नस्ती सात दिवसांमध्ये निपटारा करण्याचे प्रयत्न असून कागद विरहित कामकाज करण्यात जिल्हा परिषद पुढाकार घेत आहे.
स्कीम एप्लीकेशन पोर्टल
जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांची माहिती, उद्देश, अर्ज भरण्याच्या पद्धती याची सविस्तर माहिती या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच यावेळी पोर्टलचा वापर करून लाभार्थी डिजिटल पद्धतीने योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज देखील करू शकतात.
Block Facilitation Committee
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी यांची तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा स्तरावरावरील अधिकारी पंचायत समिती स्तरावर जाऊन तालुका सुविधा समिती योजना "Block Facilitation Committee" अंतर्गत ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत.
ई कामवाटप
जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन विकास कामाचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. यामार्फत काम वाटप आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने कामकाज करण्यात आले आहे.
कर्मचारी ई - माहिती कोष प्रणाली
कर्मचारी ई - माहिती कोष प्रणाली वेबसाईट मार्फत जिल्हा परिषदेच्या ५०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक डिजिटल पद्धतीने संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले असून सेवाविषयक सर्व बाबी व लाभ वेळेत देण्यासाठी या वेबसाईटचा वापर करण्यात येत आहे.
कामकाजात AI चा वापर
Chat-GPT,Claude ने शासकीय कामकाजाच्या टिपणी, पत्र, नोंद, संशोधन याबाबत मार्गदर्शन घेऊन काम जलद गतीने करण्यास मदत होते. Notebook LM वापर शासकीय पुस्तक, जीआर किंवा माहिती असलेले कागदपत्र अपलोड करुन संक्षिप्त प्रश्नांची उत्तरे जलद गतीने शोधुन मिळण्यास मदत होते. Canva व Gama चे वापर करून शासकीय कामकाजाचे PPT करण्यास मदत होते आहे. Myca AI वापर मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी निगडीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच उपचार घेण्यासाठी फायदा होतो. क्षेत्रिय स्तर वापर - क्षयरोग निदानासाठी एआय (AI) - सक्षम हँडहेल्ड एक्स-रे मशीन वापर करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद ठाणे संकेतस्थळ
केंद्र व राज्य शासनाच्या GIGW- Guidelines for Indian Government Websites व S3Waas - Secure, Scalable, and Sugamya (Accessible) Website as a Service - मार्गदर्शनानुसार संकेतस्थळ तयार करण्यात येऊन नागरिकांसह दिव्यांगास स्क्रीन रीडर, रंगसंगती, मजकूर आकार आदी बाबींची सुविधा देऊन संकेतस्थळ वापरण्यास सुलभ करण्यात आले आहे. सर्व विभाग व पंचायत समिती यांची सर्व माहिती अद्यावत करण्यात येऊन केंद्र व राज्य योजना, टेंडर नोटीस, भरती, कार्यक्रम, वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येते. लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सर्व विभागांच्या सर्व अधिसुचित सेवा QR Code व वेबसाइट लिंकव्दारे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. स्केलेबिलिटी (Scalability): ट्रॅफिकच्या परिस्थितीत वेबसाइट कार्यक्षमपणे कार्यरत, सुरक्षा (Security): वेबसाइटसाठी डेटा एन्क्रिप्शन आणि सुरक्षित लॉगिन, पारदर्शकता (Transparency): सरकारी योजनांची माहितीसह टेंडर, पद भरती आदि माहिती पारदर्शकपणे नागरिकांपर्यंत पोहचवली जाते.
स्वच्छता -अभिलेख निंदणीकरण व वर्गीकरण
जडवस्तु संग्रह नोंदवही अद्ययावतीकरण- सर्व विभागांच्या नोंदवहया अद्ययावत करण्यात आले. जुन्या व निरुपयोगी वस्तुंची विल्हेवाट- १५२३ वस्तुचे निर्लेखन करुन एकूण र.रु.५, ४७, ५७१/- चलनाने भरणा करण्यात आले आहे. जुने वाहन निर्लेखन- ७ निर्लेखन पुर्ण, अभिलेख ठेवण्यासाठी कॉम्पॅक्टर सुविधा, अभिलेखाचे वर्गीकरण करुन डिजिटायजेशन, स्वच्छ सुंदर कार्यालय स्पर्धेचे आयोजन तसेच प्रत्येक सोमवारी सायं. ५.३० ते ६.०० या वेळेत कार्यालयांत श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्यात यश आले आहे.
तक्रार निवारण (Grievance Redressal System)
विभागनिहाय व विषयनिहाय तक्रारींचे वर्गीकरण करून मागोवा घेतल्याने प्राप्त तक्रारींचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली. (एकूण तक्रारींच्या ८० टक्के तक्रारी ग्रा.पं. संबंधित असलेचे दिसून आले.) नागरिकांच्या तक्रारींचा साप्ताहिक आढावा व समन्वय सभेमध्ये क्षेत्रीय यंत्रणांचा आढावा घेण्यात आल्याने Auto escalation होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येते. सहा. गविअ यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. तक्रारींची वारंवारता अधिक असणा-या तक्रारदारांना व्यक्तीश: बोलवून त्यांचे समाधान करण्यात आले. आपले सरकार पोर्टल प्राप्त तक्रारी २ हजार ५१० असून निकाली २ हजार ५०८ तर पी.जि.पोर्टल प्राप्त तक्रारी 24 असून निकाली २४ तक्रारी निकाली काढण्यात यश आले आहे.
आर्थिक व औद्योगीक गुंतवणुकीस प्रोत्साहन
गुंतवणुकदार, उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी नियोजन करण्यासाठी मु.का.अ. यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग परिषद यामध्ये औदयोगिक व कामगार संघटना तसेच प्रांत, तहसिलदार, BDO, CO, MSEB, LDM, DIC प्रतिनिधी मार्गदर्शन करण्यात आले. व्यापारी कामगार वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून (जिल्हा उद्योग केंद्र,ठाणे आणि अंबरनाथ औद्योगीक संघटना दिनांक ११ एप्रिल, २०२५ रोजी अंबरनाथ, MIDC, आनंद नगर येथे बैठकीचे आयोजन) त्यांच्या अडचणी सोडविण्यात आले. गुंतवणुकदार उद्योजकांसाठी अडचणीचे निराकरण करणे. १६ CMEGP कॅम्प मध्ये प्राप्त ४२१ अर्ज अंतर्गत ३०.९३ कोटी निधीचे लाभार्थिंना DIC च्या मदतीने वितरण गुंतवणूकदार उद्योजकांसाठी प्रक्रीयेचे सुलभिरण करणे- Buyer - Seller meet चे व CMEGP गतीमानता पंधरवडयाचे आयोजन करण्यात आले.
माहिती देणारे केंद्र (Self Help Kiosk)
जिल्हा परिषदे मध्ये येणाऱ्या अभ्यागतांना जिल्हा परिषदच्या विविध विभागांची रचना व संबंधित कार्यासनांकडे असणारे कामकाज / योजना याची इत्यंभूत माहिती Self Help Kiosk द्वारे प्राप्त होते.
जिल्हा परिषद, ठाणे CSR वेब पोर्टल
सर्व विभागांची निकड व कंपनीचा CSR यांची सांगड याव्दारे घालण्यात आली. CSR वेब पोर्टलद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जांवर CSR समितीद्वारे निर्णय घेण्यात येतो. NGO, CSR पुरविणारी कंपनी व Individual नोंदणी करून मागणी पाठवता येते. नोंदणी केलेल्या संस्थाना लॉगिन व मागणी भरण्याची सुविधा तसेच जिल्हा स्तरावरून प्रमाणित केल्यानंतर पोर्टलद्वारे प्रकाशित केले जाते.
जिल्हा परिषद सुशोभीकरण
स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण, अभ्यागत कक्ष, हिरकणी कक्ष, नागरिकांना जिल्हा परिषदेची माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेत केऑस निर्मिती, जिल्हा परिषदेच्या विविध योजनेची व विभागनिहाय कामकाजाचे व ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या ठिकाणांना जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीत रंगरंगोटी करण्यात आली आहे.
Manage My Law Suit
न्यायालयीन प्रकरणांचा अलर्ट द्वारे सुनावणी दिनांक, वेळ ,केस डायरी तयार करण्यात येते. Pending Affidavit करणे, १५ दिवस, ०३ दिवस आधी व तारखेच्या दिवशी अलर्ट येतो. यामुळे न्यायालयीन प्रकरणामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी Manage My Law Suit वेबसाईट वापर करण्यात येत आहे.
सौरऊर्जा (सोलर) प्रणाली
२९ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑनग्रीड सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले आहे. विजबिलात बचत तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत, बॅकअप उर्जेचा सुनिश्चित स्रोत, दुर्गम भागात वापरास योग्य,वैद्यकीय उपकरणांचे सातत्यपूर्ण ऑपरेशन सुनिश्चित करतो, सौर यंत्रणा कार्यान्वित केल्याने टिकाऊपणा आणि पर्यावरणीय जबाबदारीची बांधिलकी दाखवून आरोग्य सेवा सुविधेची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होत आहे.
Medicine Compactor
जागा कार्यक्षमता: औषधे घट्ट एकत्र साठवून उपलब्ध जागा अनुकूल करते, विशेषत: लहान औषध कॅबिनेट किंवा मर्यादित स्टोरेज भागात फायदेशीर असून औषधांचे वर्गीकरण आणि व्यवस्था करण्यात मदत करते,वस्तूंची सहज ओळख होण्यास मदत होत आहे. ८ प्रा.आ.केंद्रात Medicine Compactor कार्यान्वीत आहेत.
शिवजल सुराज्य अभियान
शिवजल सुराज्य अभियान शुभारंभ- ग्रामपंचायत आटगाव तालुका शहापुर येथील लोकसहभागातुन वनराई बंधारा बांधण्यात आला. वनराई बंधारे/कच्चे बंधारे – ६१९, विंधण विहिर छतावरील पाऊस पाणी संकलन -२०६ , अमृतकुंड शेत तळे - १४, निर्मल शोष खड्डे -३००, बांदबंदिस्ती\जुनी भात शेती – ५९, जलतारा –४६ असे विविध कामे शिवजल सुराज्य अभियान अंतर्गत करण्यात आले आहेत.
अभ्यागत भेटीचे नियोजन व वेळांबाबत प्रसिद्धी
जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी यांचे भेटीचे नियोजन व वेळांबाबत प्रसिद्धी देण्यात आली असून अभ्यागताना वाचन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या योजनाच्या माहितींचे पुस्तिका रॅक ठेवण्यात आले असून कार्यालयीन बैठक व्यवस्था, अभ्यागतांची बैठक व्यवस्था, हिरकणी कक्ष, कर्मचारी व अभ्यागत प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी व नामफलक व दिशादर्शक, कार्यासन निहाय सहा गठठे पध्दत व्यवस्था, वाहनचालक कक्ष, सुरक्षारक्षक कक्ष व्यवस्था करण्यात आली आहे.
या गौरवामुळे ठाणे जिल्ह्याच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेस राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे. हा पुरस्कार केवळ गौरव नव्हे, तर भविष्यातील कामगिरीसाठी एक नवी प्रेरणा देणारा टप्पा आहे.