team jeevandeep 29/03/2025 mahatvachya-batmya Share
दि. ३० (जिल्हा परिषद, ठाणे)-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालये ही सार्वजनिक बांधकाम विभाग आवार, स्टेशन रोड, ठाणे (प) येथे होती. सद्यस्थितीत बांधकाम विभाग आवारातील कार्यालयांचे नुतनीकरण करण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दृष्टीकोणातून ग्रामीण घरकुल योजना, लखपतीदिदी अशा योजनांचे कामकाज विस्तृत असल्याने योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे विभाग ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा, 8 व्या मजल्यावर, इर्स्टन एक्सप्रेस हायवे, सर्विस रोड, जुपिटर हॉस्पिटल जवळ, ठाणे (प)- 400606 येथे स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.