Visitors: 226649
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

जागतिक शिखर परिषदेत सादर होणार 'देवाभाऊ' चष्मा

  team jeevandeep      29/04/2025      mahatvachya-batmya    Share


अवघ्या ३३ रुपयात १४० देशांना चष्मा पुरवण्याचा संकल्प

बदलापूरच्या साकिब गोरेंची गरुडझेप

काठमांडूच्या समिटमध्ये सर्वात स्वस्त 'देवाभाऊ' चष्म्याची निवड होणार?

     अंधत्व निवारणाच्या मोहिमेत गेली ३४ वर्ष समाजकार्य करणारे बदलापुरातील साकीब गोरे यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी आपल्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या संस्थेच्या माध्यमातून अवघ्या ३३ रुपयात चष्मा बनवला आहे. नेपाळच्या काठमांडूत होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत 'देवाभाऊ' नावाने हा चष्मा सादर केला जाणार आहे. या समिटमध्ये IAPB आणि WHO ने या चष्म्याची निवड केल्यास अमेरिकेपासून १४० देशांमध्ये गोरगरीब गरजू लोकांना ३३ रुपयांत म्हणजेच ०.३८ डॉलर्स मध्ये हा चष्मा उपलब्ध होईल.

         IAPB अर्थात जागतिक अंधत्व निवारण ही संस्था अंधत्व आणि दृष्टीदोष निवारणासाठी जागतिक स्तरावर काम करते. या संस्थेच्या माध्यमातून नेपाळच्या काठमांडूत २९ एप्रिल ते १ मे असे तीन दिवस जागतिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. या शिखर परिषदेत ७६ देशातील ७०० नामांकित संस्था सहभागी होणार आहेत. यात बदलापुरातील व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या संस्थेचाही समावेश आहे. 

आमदार किसन कथोरे यांच्या सहकार्यातून त्यांनी आतापर्यंत १७०० गावांमधून २६ लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी केली आहे. तसच १७ लाख चष्म्यांचही वाटप केले आहे.

आता साकिब गोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांपासून प्रेरणा घेत त्यांच्या नावाने सर्वात स्वस्त, टिकाऊ आणि उपयुक्त अशा चष्म्यांची सीरिज बनवली आहे. ३३ रुपयांपासून ते २६० रुपयांपर्यंतच्या या चष्म्यांमुळे जगात क्रांती घडेल असा विश्वास साकिब गोरे यांनी व्यक्त केला आहे. सध्या जगभरातील २.५ अब्ज लोक दृष्टीदोषाने त्रस्त आहेत. त्यापैकी १.१ अब्ज लोकांपर्यंत अद्यापही चष्मा पोहोचू शकलेला नाही. चष्म्याची किंमत जास्त असल्यामुळे गोरगरीब लोकांवर चष्म्याअभावी अंधारात चाचपडण्याची वेळ  आली आहे. मात्र त्यांना अवघ्या ३३ रुपयात 'देवाभाऊ' चष्मा मार्ग दाखवण्याचं काम करेल

असा दावा साकिब गोरे यांनी केला आहे. काठमांडू येथे होत असलेल्या समिटमध्ये जगभरातल्या सातशे संस्थांपैकी तीन संस्थाची सर्वात कमी दरातील चष्म्यांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकीच एक व्हिजन फ्रेंड साकिब गोरे ही संस्था आहे. या तीन संस्थांमधून एका संस्थेची IAPB कडून अंतिम निवड केली जाणार आहे. त्यामुळे काठमांडूच्या समिटमध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून बदलापुरतील सामाजिक कार्यकर्ते साकिब गोरे यांच्या 'देवाभाऊ सीरिज' चष्म्यांची निवड होणार का? याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

+