Visitors: 390890
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर भिवंडीत

  team jeevandeep      15/03/2025      mahatvachya-batmya    Share


भिंवडी :

छत्रपती शिवाजी महाराज, आपलं दैवत. याचं आपल्या दैवताचं एक भव्य मंदिर साकारण्यात आलंय. भिंवडी तालुक्यातील मराडे पाडा येथे महाराजांचे हे मंदिर गडकोट किल्ल्याप्रमाणेच भव्य दिव्य आहे.

आता या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं असून, लोकार्पणाचा मुहूर्तही ठरला आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता म्हणून इतिहासावर ठसा उमटवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आता दिमाखात उभं राहीलं आहे. मुंबईमधील भिवंडीतल्या मराडे पाडा इथे हे मंदिर बांधण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मंदिराचं भूमीपूजन 2018 मध्ये झालं होतं. मात्र, मध्यंतरी कोरोनामुळे कामाला उशीर झाला. आता मात्र मंदिराचं काम पूर्ण झालं आहे. हे शक्तीपीठ आता दिमाखात उभं राहिलं आहे. कसं आहे शिवरायांचे भव्य मंदिर ? -एकरभर जागेत 56 फूट उंचीचं भव्य मंदिर - मंदिराची रचना किल्ल्यासारखी, मंदिराभोवती 4 बुरूज - मंदिराला 36 फूट उंचीचं महाद्वार - गाभारा सभामंडप 2500 चौरस फूट क्षेत्राचा - मंदिरात सहा फूट उंचीची सिंहासनारूढ महाराजांची मूर्ती - सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराजांनी साकारली महाराजांची मूर्ती - अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून मूर्ती साकारली - मंदिराभोवती 36 चबुतऱ्यांमध्ये महाराजांच्या इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिरात वैदिक शिक्षण देण्याचा मानस आहे. हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरावं यासाठी शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण देण्याचाही मनोदय आहे. येत्या १४ ते १७ मार्च या काळात तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पणाच्या भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील साधू-संत, महंत, वारकरी, शिवकालीन मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत. या चार दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक, आध्यात्मिक व कला या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे भव्य मंदिर अक्षरक्षा डोळ्यांचं पारणे फेडणारं आहे. या मंदिरातील शिल्पकला पाहून आपणही आपसुकच शिवकाळात जातो. हे केवळ मंदिर नसून आपल्या सगळ्यांसाठी शक्तिपीठ असणार आहे.

+