Visitors: 227251
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. राज ठाकरेंचा पाडवा मेळाव्यात जोरदार हल्लाबोल

  team jeevandeep      31/03/2025      mahatvachya-batmya    Share


राज ठाकरे :

आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर

मनसेचा भव्य गुढीपाडवा मेळावा (Gudi Padwa Melava) पार पडला.

या मेळाव्यामध्ये बोलताना मनसे ( MNS )

प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार फटकेबाजी केली. तर सध्या सुरू असलेल्या औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून त्यांनी चांगलंच सुनावलं. सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी ( Raj Thackeray ) चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत, असा टोला देखील लगावलं आहे. आज मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला हजारो मनसैनिक उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, औरंगजेबाची कबर हटवायची, आताचा हा विषय कुठून आलाय? चित्रपटामुळे जागे होणारे हिंदू काही कामाचे नसल्याची टीका त्यांनी केलीय. चित्रपट उतरला की मग हे उतरले. विकी कौश मेल्यानंतर अन् अक्षय खन्ना औरंगजेब बनल्यानंतर तुम्हाला औरंगजेब कळला का? असा देखील सवाल त्यांनी भरसभेत केलाय. 'मराठ्यांचा इतिहास दाखवायला औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे... पाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? व्हॉट्स अॅपवर इतिहास वाचता येत नाही. तुम्हाला इतिहास वाचण्यासाठी पुस्तकं वाचावी लागतील. औरंगजेबावर कुणीही बोलत आहेत. विधानसभेत बोलत आहेत.

गुजरातमधला औरंगजेबाचा जन्म आहे. याबद्दल माहिती आहे का? इतिहासातून डोकं फिरवायला आहेच. ब्राह्मणांनी, मराठ्यांनी औरंगजेबाला साथ दिली, असं सांगितलं जातंय. हे सगळं माथी भडकवण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. कोणता इतिहास सांगतो आहोत? असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी उपस्थित केलाय. इतिहासांच्या पानामध्ये गेलात तर अपेक्षांची भांडी ठळाठळ फुटतील, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय.  महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असेल तर भाजपला पाठिंबा, राज ठाकरे उघड बोलले । मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात सभेला संबोधित करताना विविध विषयांनार हात घातला. छावा चित्रपटानंतर निर्माण झालेल्या वादावर राज ठाकरेंनी जाहिरपणे अतिशय कडवट भूमिका मांडली आहे. यावेळी परिस्थितीनुसार कशा पद्धतीने निर्णय घेतले जातात, त्याची दाखले देखील राज ठाकरे यांनी दिलेत. राजकीय पक्ष जातीपातीत अडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय.

 

+