Visitors: 390230
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

चटका लावणारी एक्झिट !

  team jeevandeep      06/04/2025      mahatvachya-batmya    Share


अभिनयाच्या विविध कंगोऱ्यातून अंगीकारलेल्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांच्या केवळ पसंतीसच नव्हे तर लक्षवेधी अशी भूमिका साकारून आनंद देणारे अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे अकस्मात जाणं मनाला चटका लावून गेलं. 

जीव ओतून काम करण्याची हातोटी, दमदार आवाजातील वैशिष्ट्यपूर्ण स्वच्छ, सुस्पष्ट, पहाडी संवादफेक, सहज, सुंदर, नैसर्गिक मुद्राभिनय ही त्यांची खास आयुधं होती.

डॉक्टरांनी सुमारे सदुसष्ट मराठी नाटके, एकशे दहा अधिक चित्रपट, एकशे चाळीस मालिका साकारत  हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप तेवढ्यात ताकदीने उमटवली. चार दिवस सासूचे, दामिनी, वादळवाट आदी अनेक मालिकां, नाटक, चित्रपटांमधून महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत त्यांनी आपल्या अभिनयाचे विविधांगी कंगोरे पेश करून जो आनंद दिला तो कायम रसिक मनावर राहणार आहे. अनोखी अभिनय शैली आणि संवाद पैकीच्या बळावर कलाक्षेत्रात वेगवेगळे स्थान निर्माण करणारे डॉक्टर विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

+