team jeevandeep 02/05/2025 mahatvachya-batmya Share
कल्याण :
कल्याण तालुक्यातील रेशनींग दुकानदार चांगली सेवा देत आहेत. त्यांच्या बाबत तक्रारी येत नाहीत. या रेशनींग देकानदारांचे काही प्रश्न अडचणी आहेत ते सोडवणार असल्याची ग्वाही आमदार किसन कथोरे यांनी दिली
कल्याण तालुका रेशनींग दुकानदारांची सभा तहसील कार्यालयात सपन्न झाली, यावेळी यावेळी बोलताना आमदार किसन कथोरे बोलत होते. रेशनिंग दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष वसंत लोणे यांनी याप्रसंगी दुकानदारांचे प्रश्न व अडचणी सांगितल्या त्या ऐकून घेतल्या नंतर श्री कथोरे यांनी या दुकानदारांना तुमच्या सोबत असल्याचे सांगून कल्याण येथे गोडाऊन उभारणी करणे, रेशनिंग दुकानदारांचे कमिशन वाढ करणे याबाबत त्वरित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, यावेळी तहसीलदार सचिन शेजल यांनी प्रास्ताविक करत तालुका दक्षता समिती ची माहिती दिली, प्रांत अधिकारी विश्वास गुजर या प्रसंगी उपस्थित होते. तसेच नायब तसीलदात श्री चव्हाण साहेब, पुरवठा अधिकारी मॅडम उपस्थित होत्या. यावेळी महिला बचत गट रेशनींग दुकानदारांनी आपले म्हणणे मांडत कमिशन वेळेवर देण्याची मागणी केली.