Visitors: 228283
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

कचरा वेचून उपजीविका चालवणाऱ्या 'गुलाब'ची भाजपच्या शहर उपाध्यक्ष पदी निवड

  कल्याण(प्रतिनिधी )      21/08/2024      mahatvachya-batmya    Share


 

कल्याण  : कचरा वेचून कुटूंबाची उपजीविका चालविणाऱ्या गुलाब जगतापची कल्याण शहर भाजपच्या उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे नियुक्ती पत्र माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

गुलाब जगताप हे कल्याण पश्चिम भागातील साठे नगर झोपडपट्टीत कुटूंबासह राहून डंपिंगवर कचरा वेचण्याचे काम करतात.  आईच्या पावलावर पाउल ठेवून त्यांनी हाच व्यसायाय निवडल्यांच ते सांगतात. माझी आई  समाजकार्याचा एक भाग म्हणून शहरातील कचरा वेचून पोटाची खळगी भरत होती. गुलाब हे लहान वयात असतानाच (आरएसएस) संघाच्या जेष्ठ पदाधिकारी ललित सांरग, मधु फडके, माजी आमदार नरेंद्र पवार,  अरुण देशपांडे, सुरेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक व राजकीय जीवनात सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कल्याण भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी गुलाबचे तळागळातील लोकांसाठी सामाजिक कार्य व पुढाकार पाहून त्यांची निवड केल्याचे सांगितले. त्यांना नियुक्ती पत्र देताना भाजपचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

+