team jeevandeep 31/03/2025 mahatvachya-batmya Share
कल्याण :
मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी देशातील नद्या प्रदूषणावरुन सरकारवर हल्ला चढवला, यावेळी महाराष्ट्रातील नद्यांचे वाढते प्रदूषण किती गंभीर आहे हे 'लाव रे तो विडिओ, च्या माध्यमातून सर्वासमोर मांडले, याप्रसंगी महाराष्ट्रातील ५५नदीपट्टे प्रदूषित असल्याचे सांगून सर्वात टाँपवर कल्याण तालुक्यातील उल्हासनदी असल्याचे सांगितले, सध्या या नदीचे पात्र जलपर्णीने ने व्यापले गेले असून यामुळे यातील मासे व इतर जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. तर पशु पक्षी, शेळ्या, मेंढ्या, बक-या, गायी म्हैशी यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
कंभमेळ्यातील गंगा नदी प्रदूषण सध्या महाराष्ट्रात गाजत वाजत आहे. हा आपला मुद्दा टिकेनंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लावून धरला, काल झालेल्या शिवाजी पार्क वरील गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी देशातील नद्या प्रदूषणावरुन सरकार वर हल्ला चढवला, देशात ३११नदी पट्टे प्रदूषित असल्याचे सांगून यामध्ये महाराष्ट्रातील५५नदीपट्टे सर्वाधिक प्रदूषित झाले आहेत. यात सर्वात टाँपवर ठाणे जिल्ह्यातील'उल्हासनदी, असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या उल्हासनदीचे पात्र जलपर्णीने व्यापले आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मोहने आणि मोहिली येथील १०० एम एल डि क्षमतेने जलशुद्धीकरण केंद्र,एमआयडीसी चे म्हारळ जवळील राँ वाँटर केंद्र हेही या जलपर्णीने घेरलेले आहे, शिवाय अनेक ग्रामपंचायतीचे जलस्त्रोत, विहिरी, जलाशय, जलपर्णी मय झाले आहेत, यामुळे मासे, व इतर जलचर, यांना जलपर्णी मुळे आँक्सिजन न मिळाल्याने त्यांचे जीवन धोकादायक बनले आहे, तर कडक उन्हात बकरी, शेळ्या मेंढ्या, गायी म्हैस यांना पाण्यासाठी जिते जलपर्णीने नाही अश्या ठिकाणी भटकंती करावी लागत आहे.
एकूणच उल्हास नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत असून यावर वेळीच उपाययोजना न केल्यास मानवी जीवन देखील धोक्यात यायला वेळ लागणार नाही. केवळ आश्वासने देऊन हा प्रश्न सुटणार नाही.