Visitors: 227279
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

उल्हासनगरमध्ये २६ बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; १८ मुन्नाभाईंवर गुन्हे दाखल

  team jeevandeep      26/03/2025      mahatvachya-batmya    Share


ठाणे : 'उद्योग नगरी' म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात २६ बोगस डॉक्टरांचा महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केलाय. तर यापैकी १८ बोगस डॉक्टरांवर उल्हासनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असलेल्या बोगस डॉक्टरांपैकी सर्वाधिक परराज्यातील असल्याचं समोर आलंय.

बोगस डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी : मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं चौकशी केली असता, उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात काम करत असलेल्या एकूण २६ डॉक्टरांच्या नावाची यादी प्राप्त झाली. त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी प्रथम धडक मोहीम राबवण्यात आली. सदर मोहिमेंतर्गत बोगस प्रमाणपत्र आढळून आलेल्या डॉक्टरांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यांच्यामार्फत देण्यात आले होते.

बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल : वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत डॉ. मोहिनी धर्मा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या टीमकडे प्राप्त अहवालानुसार शहरातील अनेक डॉक्टर वैद्यकीय परवाना नसतांना किंवा अपात्रत्रेसह व्यवसाय करत असल्याचं आढळून आलं. अशा बोगस डॉक्टरांच्या कागदपत्रांची पाहणी करुन त्यामध्ये आढळून आलेल्या एकूण १८ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर उर्वरित ८ डॉक्टरांपैकी ३ डॉक्टर महाराष्ट्र कॉन्सिल यांचंकडं नोंदणीकृत आहे. तर ४ डॉक्टरांची पाहणी केली असता नमूद ठिकाणी त्यांचं क्लिनिक बंद आहे. तर १ डॉक्टर कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात येत असल्यानं सदर डॉक्टरांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत कार्यवाही करण्यात आल्याची माहिती, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी दिलीय.

+