Visitors: 227289
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

आमदार .किसन कथोरे च्या प्रयत्नांना यश... मुरबाड तालुक्यातील ५०० शेतकरी बांधवांना २०२०-२१ च्या भात खरेदीचा बोनस लवकरच मिळणार

  team jeevandeep      25/03/2025      mahatvachya-batmya    Share


मुरबाड :

मुरबाड तालुक्यातील,सन २०२०-२१ मध्ये  सुमारे ५०० हुन अधिक शेतकरी बांधवांना ऑनलाईन नोंदणी मध्ये अडचण आल्यामुळे  भात खरेदीचा बोनस मिळाला नव्हता,या शेतकऱ्यांच्या पाठीशी बोलें तैसा चाले या उक्ती प्रमाणे  आमदार मा.श्री.किसन कथोरे सामाजिक कार्यकर्ते,रमेश हिंदुराव  व शेतकरी बांधव सतत पाठपुरावा करत होते.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आमदार किसन कथोरे यांनी  हा प्रश्न उचलून धरला होता,त्या अनुषंगाने सोमवार दि.२४ मार्च २०२५ रोजी  विधी मंडळात हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी संधीही मिळाली,परंतु त्यांच्या   कुटुंबात दु:खद घटना घडल्यामुळे  अधिवेशनाला उपस्थित राहता आले नव्हते, 

 तरीही शेतकरी बांधवांना न्याय मिळावा या भावनेने आमदार किसन कथोरे यांनी  सहकारी आमदार .श्री.संजयजी केळकर  यांचेमार्फत हा प्रश्न विधीमंडळ सभागृहात उपस्थित केला आणि संबंधित मंत्री महोदयांकडून सकारात्मक उत्तर मिळविण्यात यश मिळविले.

लवकरच हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागून मुरबाड तालुक्यातील ५०० शेतकरी बांधवांना भात खरेदी पोटी चा ७९ लाख रुपयांचा बोनस वाटप करण्यात येणार आहे.

 आमदार मा.श्री.किसन कथोरे व सहकारी आमदार मा.श्री.संजय केळकर यांचे शेतकऱ्याकडून  आभार मानले जात आहेत.

+