कल्याण(प्रतिनिधी) 08/08/2024 mahatvachya-batmya Share
कल्याण : २०२४ च्या मोदी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काहीच न दिल्यामुळे महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या केंद्र सरकारचा कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध नोंदवला.केंद्र सरकारने काल अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला काहीच मिळाले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनता निराश झालेली असून या केंद्र सरकारने सोन्याचा भाव कमी करून परत एकदा दाखवून दिलं की आम्ही श्रीमंतांच्या बाजूने आहोत गोरगरिबांशीं आम्हाला काही घेणे देणे नाही.