team jeevandeep 27/03/2025 mahatvachya-batmya Share
दि. 26 (जिल्हा परिषद, ठाणे)
- मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये 100 दिवसांचा कृती कार्यक्रम व महा आवास अभियान सन 2024-25 अंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, मंजुर घरकुलांना पहिला हप्ता वितरीत करणे, सर्व घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे हे उपक्रम समाविष्ट आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार जिल्हयात सर्वत्र एकाच दिवशी 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी दि. 27 मार्च, 2025 रोजी सकाळी 10.00 रोजी सर्व ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.
त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण गृह निर्माण अभियंता, ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या सहभागाने भूमीपूजन कार्यक्रम राबविण्याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच या भूमीपूजन कार्यक्रमांमध्ये सर्व लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत ठाणे जिल्ह्याकरीता 2024-25 करीता 18 हजार 231 (अंबरनाथ-919,भिवंडी-4 हजार 529,कल्याण-1 हजार 079,मुरबाड-5 हजार 897 व शहापूर-5 हजार 807) एवढे उद्दिष्ट प्राप्त असून आज अखेर 18 हजार 010 (अंबरनाथ-915,भिवंडी-4 हजार 437,कल्याण-1 हजार 070,मुरबाड-5 हजार 810 व शहापूर-5 हजार 778) एवढी मंजुरी देण्यात आलेली आहे. यापैकी 15 हजार 279 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करणेत आलेला आहे. त्यापैकी 2 हजार 477 घरकुले बांधकाम सुरु झाले असून 12 हजार 802 घरकुले तातडीने सुरु करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान (Pm Janman) अंतर्गत ठाणे जिल्हयातील 12 हजार 976 (अंबरनाथ-887,भिवंडी-4 हजार 060,कल्याण-969,मुरबाड-3 हजार 08 व शहापूर-4 हजार 052)लाभार्थी पात्र ठरले असून यापैकी 8 हजार 795 (अंबरनाथ-613,भिवंडी-3 हजार 061,कल्याण-484,मुरबाड-1 हजार 666 व शहापूर-2 हजार 971) घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे.यापैकी 5 हजार 086 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. त्यापैकी 1 हजार 594 घरकुले बांधकाम सुरु झाले असून 3 हजार 492 घरकुले तातडीने सुरु करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत 518 (अंबरनाथ-10,भिवंडी-79,कल्याण-10,मुरबाड-234 व शहापूर-185) घरकुले तातडीने सुरु करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे रमाई आवास योजनेअंतर्गत 91 (अंबरनाथ-3,भिवंडी-3,कल्याण-4, मुरबाड-68 व शहापूर-13) घरकुले तातडीने सुरु करणे आवश्यक आहे. असे एकूण जिल्हयामध्ये 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांचा भूमीपूजन कार्यक्रम दि. 27 मार्च,2025 रोजी ग्रामपंचायत स्तरावर संपन्न होणार असून सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत आवाहान करण्यात येत आहे.