Team jeevandeep 17/05/2025 mahatvachya-batmya Share
'सनातन राष्ट्रा'चा जयघोष करत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील 2 हजार 500 हून अधिक हिंदुत्वनिष्ठांचे गोव्याकडे प्रस्थान
मुंबई - मानवजातीच्या परमकल्याणासाठी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फोंडा-गोवा येथे 17 ते 19 मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून सनातन संस्थेचे 2 हजार 500 हून अधिक साधक, हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी ‘सनातन राष्ट्रा’चा जयघोष करत चारचाकी वाहने, बस, रेल्वे आणि विमानातून गोव्याकडे प्रयाण केले. यावेळी हिंदुत्वनिष्ठांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या, तसेच वाहनांवर लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे वातावरणात चैतन्य पसरले होते.
हा महोत्सव म्हणजेच रामराज्याच्या दिशेने एक सामूहिक पाऊल आहे. या महोत्सवातून साधक आणि धर्मप्रेमी हिंदू देव, देश अन् धर्म रक्षणासाठी नवा संकल्प घेऊन कृतीशील होतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट द्या !