Visitors: 228202
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

शिवसेना महिला कार्यकर्त्या घेणार एसटी आगारांची झाडाझडती

  Thane jeevandeep team       27/02/2025      mahatvachya-batmya    Share


st agar 

मुंबई : राज्यभरातील राज्य परिवहन मंडळाच्या आगारांमधील सोयी सुविधांचा शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक आगारातील सुविधा खासकरुन महिलांसाठी पुरेशा सुविधा आहेत की नाही याची प्रत्यक्ष खातरजमा आता शिवसेना पक्षाकडून केली जाणार आहे. गैरसोयींबाबतचा अहवाल व्हाट्सअँपद्वारे सादर केला जाणार असल्याची माहिती शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी दिली.   

शिवसेनेकडून या संदर्भात महिला पदाधिकाऱ्यांसाठी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. राज्य परिवहन आगारांमध्ये महिलांना गैरसोईचा सामना करावा लागत असल्याचे पक्षाच्या निदर्शनात आले आहे. आपल्या भागातील राज्य परिवहन विभागाच्या आगारांना भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी करून भेटीचा सविस्तर तपशील कळविण्याचे आवाहन महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे परिवहन विभाग आहे. परिवहन मंत्री यांनी महिला आघाडीच्या एसटी आगारांच्या परिक्षणाला हिरवा कंदिल दाखवला आहे. महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील बसस्थानकांना भेट देऊन तेशील स्थानिक प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सोबतीने त्याठिकाणी असलेल्या सोईसुविधांची पाहणी करावी, अशा सूचना पक्षाने दिल्या आहेत. 

या भेटी दरम्यान महिलांकरिता स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह, स्तनदा मातांकरिता हिरकणी कक्ष आणि त्याची स्थिती, दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेशाची सुविधा, विश्राम गृह, महिला अधिकारी/कर्मचाऱ्यांकरिता स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह व विश्रामाची जागा, महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांकरिता विशाखा समितीची स्थापना व समितीतील संबंधितांची संपर्कासह दर्शनी भागात माहिती, स्वच्छ पिण्याचे पाणी व नीटनेटके खानपान गृह अशा घटकांचा आढावा घेण्याचे निर्देश पक्षाने दिले आहेत. २८ फेब्रुवारी ते  ३ मार्च २०२५ या दरम्यान आगारांना भेटी देऊन त्या भेटीची सविस्तर सचित्र टिपणी ७९७७४६६०८५ या नंबरवर व्हाट्सअपद्वारे तात्काळ पाठवावीत. या तक्रारींवर परिवहन विभागाचे मंत्री, सचिव व जबाबदार अधिकाऱ्यांकडून योग्य ती कार्यवाही करता येईल, असे  डॉ. मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.

+