Visitors: 228090
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

शिवरायांचा एकतरी गुण अंगीकारला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल* - *एकनाथ शिंदे*

  team jeevandeep      18/03/2025      mahatvachya-batmya    Share


**शिवरायांचा एकतरी गुण अंगीकारला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल* - *एकनाथ शिंदे* 

*डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण ''*

- *हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत दैदिप्यमान सोहळा*

कल्याण :  प्रत्येकाने शिवरायांच्या गुणांपैकी एकतरी गुण अंगीकारला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील घारडा सर्कल येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला असून, याचा भव्य असा अनावरण सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते या भव्य आणि सुंदर शिल्पाचे अनावरण आज करण्यात आले यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

 मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरातील पूर्व येथील घारडा सर्कल आता '' छत्रपती शिवाजी महाराज चौक '' या नावाने ओळखला जाणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागातील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण  उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडले. हा भव्य पुतळा उभारण्यासाठी महापालिका क्षेत्रातील मुलभुत सोयीसुविधांच्या विकासासाठी तरतूद याअंतर्गत निधी मंजूर झाला असून, याबाबतचा प्रशासकिय ठराव सप्टेंबर 2024 मध्ये मंजूर झाला आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा 12 फुटी अश्वारूढ पुतळा घारडा सर्कलच्या मध्यवर्ती भागात बसविला असून, आजू बाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, आमदार राजेश मोरे, भाजपा नेते जगन्नाथ पाटील, समाज प्रबोधनकार संग्राम बापू भांडारे,  शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितले की, सगळ्यांचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शौर्य, समर्पण. आज तिथी प्रमाणे शिवजयंती आहे. हा योग असून यादिवशी या पुतळ्याचे लोकार्पण होतंय. आता हा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखणार. पुतळ्याचं वैशिष्ट्य आहे, यामध्ये शिवाजी महाराजांचं दर्शन होतंय. महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला यात घोडदळाच वेगळं महत्त्व होतं. शत्रूला चाहूल न लागता हे घोडे पराक्रम करत होते. महाराजांचा अश्वारूढ पुतळा इतिहासाची साक्ष देत राहील. हे फक्त पुतळे नसून महाराजांच्या पराक्रमाची आठवण असल्याचे त्यांनी सांगितले.

+