Team jeevandeep 26/05/2025 mahatvachya-batmya Share
दोन म्हशी वाहून गेल्याची भिती स्थानिकांची माहिती
कल्याण : कर्जत, खोपोली परिसरात पडलेल्या अति मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील उल्हास नदीस अचानक पूर आला, या पुरात एक बस आणि दोन म्हशी वाहून गेल्याची माहिती आपटी गावचे स्थानिक नागरिक वंसत शिसवे यांनी दिली, तर रायते बदलापूर रस्त्यावर पाणी भरल्याने या परिसरातील५/६गावांचा संपर्क तुटला आहे, विशेष म्हणजे यामुळे' आपती व्यवस्थापन,किती अर्लट, हे लक्षात येते,
गेल्या१/२दिवसापासून कर्जत, खोपोली परिसरात तूफान पाऊस पडत आहे, परंतु कल्याण, बदलापूर, परिसरात पावसाची तुरळक रिमझिम सुरू होती, यामुळे सर्व नागरिक बेसावध होते, परंतु आज अचानक उल्हास नदीस प्रंचड पूर आला, यामुळे प्रथम अम्मू रिसार्ट जवळ पाणी भरल्याने रायते आपटी रस्ता बंद झाला, या दरम्यान आपटी गावातील वंसत शिसवे हे नदीच्या काठावर उभे राहून पाण्याची पातळी बघत होते, यावेळी त्यांना पुराच्या पाण्यातून २म्हशी वाहून जात असल्याचे दिसले, यांनतर काही वेळातच एक बस वाहून जाताना दिसली, ते दृश्य मोबाईल मध्ये कैद करण्याच्या आत पाण्याच्या प्रंचड वेगामुळे ती दिसेनाशी झाली,
पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने रायते बदलापूर रस्ता पाण्याखाली गेला, यामुळे आपटी चोण, आपटी बा-हे,मांजर्ली, पोई, बांधण्याचा पाडा, कातकरी वाडी, ढोका दापिवली आदी गावाचा संपर्क तुटला, रायते येथे कल्याण मुरबाड रस्त्याच्या पुलाचे काम सुरू आहे, याचेही काही साहित्य वाहून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही,
या अचानक आलेल्या पुरामुळे नदी काठच्या गावाची मोठ्या प्रमाणात पळापळ झाली, काही चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या अचानक आलेल्या पुराचे कारण बारवी डँम सोडल्याची अफवा लोकामध्ये पसरल्याचे दिसून आले, तर बाबतीत बारवी डँमचे इंजिनिअर दुश्यांत विखे यांना विचारले असता, आपण तहसीलदार कल्याण यांना पाणी लेवल कळविल्याचे उत्तर देऊन खांदे उडविले, आता सर्व सामान्य माणूस काय तहसीलदार यांना विचारणार आहे का?हे या महाशहाना कोण सांगणार?
तर कल्याण मध्ये परिस्थिती वेगळी नव्हती मेट्रोच्या कामामुळे कल्याण मुरबाड मार्गावर सिंधीगेट येथे अनेक बाईक स्वार पडत होते, रस्त्यावर गंटारगंगा वाहत होती, एकूणच पहिल्याच पुरामुळे नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागला, आणि 'आपत्ती व्यवस्थापन ,संदर्भात देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत,यातील वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय आणि माहिती चा अभाव दिसून आला.