Visitors: 227297
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

मुरबाड शहरातील महिलांना कोट्यवधीचा गंडा घालणार्या त्या 'राणीला'मुरबाड पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

  team jeevandeep      02/04/2025      mahatvachya-batmya    Share


मुरबाड : 

मुरबाड शहरातील तोंडलीकरनगर येथे एका उच्च भ्रू सोसायटीत राहणाऱ्या राणी जनार्दन देशमुख नावाच्या महिलेने शहरातील शेकडो महिलांना तब्बल 7 ते 8 कोटीला गंडवून पोबारा केला होता. महिलांच्या तक्रारी नंतर फरार असलेल्या मुरबाडच्या त्या राणीला ( बबली) अखेर मुरबाड पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मुरबाड शहरात अनेक महिलांचे महिन्याला पैसे जमा करून भिशी लावण्याचा प्रकार आहे.त्यातुन आपल्या कुटुंबाची आर्थिक बचत करण्याचा उद्देश असतो. मग ही भिशी कोणीतरी एक प्रमुख महिला चालवित असते या महिलेकडे इतर सर्व सदस्य महिला दर महिन्याला पैसे जमा करत असतात. अशाच प्रकारे तोंडलीकरनगर येथे राहणारी रानी देशमुख सुद्धा हा व्यवसाय करायची.भिशी लागलेल्या दुसर्या महिलेचे पेसै ती तिसर्या व्यक्तीस व्याजी देत होती. गेली अनेक वर्ष " याची टोपी त्याला त्याची टोपी याला" लावुन महिलांच्या अज्ञान पणाचा फायदा घेत त्यांना बुमरंग करत होती.असे शेकडो महिलांचे लाखो रूपये तिने गोळा केले आहेत व या पैशातून तिने काही प्रापर्टी सुद्धा जमा केली असल्याचे कळते. याज बरोबर तिने अनेक नातेवाईक महिलांचे काही कोटी रुपये सोन्याचे दागिने दोन चार दिवसांच्या बोलीवर परत आणून देते असे खोटे सांगून गंडा घालून लंपास केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

राणी देशमुख जेव्हा आपल्या राहत्या घरी दिसत नसल्याचे भिशी भरणार्या महिलांच्या लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून मुरबाडच्या या( बबली) विरोधात मुरबाड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती .त्यानंतर मुरबाड पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली व काही तासांत बाहेर पळून जाण्याच्या बेतात असणार्या राणीला शोधून काढली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची व शेकडो महिलांची  फसवणूक एकटी राणी देशमुख करू शकत नसून तिचा बोलविता धनी (मास्टर माईंड) कोण आहे याचा तपास लावणे मुरबाड पोलिसांसमोर आव्हान असून  मुरबाड पोलीस स्टेशनचे पो.नि.संदिप गिते या गंभीर घटनेचा पुढील तपास करत असून लवकरच अन्य कोण साथिदार आहेत का? याचाही शोध घेतला जाणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.

" दरम्यान फसवणूक झालेल्या सर्व महिला सामान्य कुटूंबातील असून महिला घाबरल्या आहेत.आपले गेलेले लाखो रूपये व दागिने कसे परत मिळणार या विवंचनेत या महिला असून त्या लबाड महिले कडून  लवकरात लवकर वसूल करावी अशी मागणी फसवणूक झालेल्या महिलांकडून होत आहे.

+