team jeevandeep 03/03/2025 mahatvachya-batmya Share
विधानसभेच्या (Vidhan Sabha Election 2024) निकालानंतर विधानपरिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्या होत्या. या निवडणुकीसाठी उमेदवारांना 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर 18 मार्च रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर 20 मार्च रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे आणि 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. शिवसेना आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर, भाजप आमदार प्रवीण दटके, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप आमदार रमेश कराड विधानसभा निवडणुकीत जिंकल्याने विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या तर आता पाच जागांवर 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडून या निवडणुकीमध्ये कुणाला संधी मिळणार याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषद निवडणूकीसाठी कार्यक्रम
10 मार्च ते 17 मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया
18 मार्च: अर्ज छाननी प्रक्रिया
20 मार्च: अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
27 मार्च : मतदान
विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ : एकूण 78
महायुती : 32
भाजप : 19
शिवसेना (शिंदे गट) : 6
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 7
महाविकास आघाडी : 17
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 3
काँग्रेस : 7
शिवसेना (ठाकरे गट) :7
अपक्ष : 3