Visitors: 227019
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पारेषण कंपनीकडून सुरू असलेल्या टॉवर लाईन विरोधात शिवसेना (उबाठा )चे वाहोली येथे आंदोलन !

  team jeevandeep      03/05/2025      mahatvachya-batmya    Share


कल्याण :

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पारेषण कंपनीकडून पडघा भादाणे ते मुरबाड तालुक्यातील मालेगांव पर्यंत इलेक्ट्रोड टॉवर लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु यातील बाधित शेतकऱ्यांना ना नोटीस, ना काही सूचना न  देताच जबरदस्तीने  सुरू असलेले लाईन टाकण्याचे कामाच्या विरोधात शिवसेना (उबाठा )ने कंबर कसली असून आज वाहोली येथे शेतकऱ्यांचे निषेध अंदोलन करण्यात आले, यावेळी शासनाचा निषेध करून जो पर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत विद्यूत कंपनीच्या अधिकां-यांना जमीनीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अँड अल्पेश भोईर यांनी दिला आहे. याप्रसंगी विद्यूत वितरण कंपनीच्या अधिकां-याना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी वाहोलीच्या शेतकऱ्यांनी  टॉवर लाईन चे कामबंद पाडले होते,,तथापि कल्याण तालुक्यातील ११ते१२गावातील शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता, यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पुढाकाराने बैठक झाली परंतु यामध्ये तोडगा निघाला नाही, नंतर प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस, विद्यूत कंपनी यांना निवेदन देण्यात आले.तथापि आज कल्याण तालुक्यातील वाहोली येथे पारेषण कंपनीच्या विरोधात निषेध अंदोलन आयोजित करण्यात आले होते, यावेळी शिवसेना (उबाठा)  चे जिल्हाप्रमुख अँड अल्पेश भोईर यांनी 'दाम नाही तर काम नाही ,असा इशारा दिला, तर शिवसेनेचे विश्वनाथ जाधव यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत शेतात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला दरम्यान या टॉवर लाईन ला रुंदे, म्हसकळ, आपटी, वाहोली,चिंचवली, उतणे, वसत, नडगाव, कुंभारपाडा, गोवेली,जांभूळ, आदी१२ते १३गावातील शेतकरी उपस्थित होते.याप्रसंगी विद्यूत पारेषण कंपनीच्या व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या कंपनीचे उल्हास तापकिरे आणि समीर कांबळे या अधिका-याना शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे आपल्या सहका-यासह उपस्थित होते. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेश सुरोश, शरद पवार पक्षाचे अँड अविश जुवारी म्हसकळ चे श्री भोईर, आपटीचे सुनील शिसवे, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

+