team jeevandeep 17/02/2025 mahatvachya-batmya Share
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील मिळकतींचे अचूक भूमापन करून नकाशे व मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ‘नक्शा’ प्रकल्प सुरू केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आणि ड्रोन फ्लाईंग येत्या मंगळवार, दि.18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता कुळगाव-बदलापूर नगरपरिषद सभागृह, दुसरा मजला, श्रीजी बिल्डींग, घोरपडे चौक, कात्रप, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य किसन कथोरे, डॉ.बालाजी किणीकर, सुलभा गायकवाड कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, उपसंचालक अनिल माने, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तरी, या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अंबरनाथ तहसिलदार अमित पुरी, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख अंबरनाथ सुवर्णा पाटील यांनी केले आहे.