team jeevandeep 07/03/2025 mahatvachya-batmya Share
मुरबाड-प्रतिनिधी :
मुरबाड तालुक्यातील उपक्रमशील आदर्श शिक्षिका रंजना उत्तम डोहळे यांना " जीवन गौरव पुरस्कार " देऊन सन्मानित केले जाणार आहे.
8 मार्च जागतिक महिला दिना निमीत्त रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्सच्या वतीने 8 मार्च 2025 रोजी कल्याण येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
श्रीमती रंजना उत्तम डोहळे या गेली 27 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात प्राथमिक शिक्षिका म्हणून उल्लेखनीय काम करत आहेत. या 27 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी सर्व जाती धर्माच्या तसेच तळागाळातील विद्यार्थ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यांनी मिळवुन दिला आहे. मुरबाड तालुक्यातील मोहरई येथे शाळेत शिक्षिका असताना दिवाळी नंतर कातकरी समाजाच्या मुलांचे विटभट्टीवर होणारे स्थलांतर रोखण्यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत हंगामी वसतीगृहाची स्थापना करून मुलांचे स्थलांतर रोखले.त्यांनर दिव्यांग मुलांसाठी असणाऱ्या शासकीय योजना सर्वतोपरी राबविण्यावर भर दिला.ज्ञान दानाचे पवित्र काम करत असतानाच त्यांना एके दिवशी महाराष्ट्र शासनाच्या म हिला व बालविकास विभागाकडून "बाल संगोपन" योजनेची माहिती मिळाली.ही योजना मुरबाड सारख्या ग्रामीण भागात अनेक माता भगिनींना माहिती नसल्याने तिचा लाभ माता व बालकांना मिळत नव्हता. डोहळे मॅडम यांनी स्वतः जिल्हा परिषद ठाणे येथे जाऊन या योजनेची माहिती घेतली व या योजनेत बसणार्या महिला शोधून त्यांना लाभ मिळवुन दिला.आज ही अनेक महिला याचा लाभ घेत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात आजही सतत नवनिर्मितीचा ध्यास व संकल्पना राबवुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सतत धडपडणाऱ्या या आदर्श शिक्षिकेच्या शैक्षणिक कार्याची रोटरी क्लब ने दखल घेऊन त्यांना येत्या 8 मार्च रोजी सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.