team jeevandeep 28/02/2025 mahatvachya-batmya Share
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला. बलात्कारानंतर हा आरोपी जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अखेर सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला गुणाट या गावातून मध्यरात्री अटक केली. यानंतर आरोपीला आज पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपीला पुणे न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.