Visitors: 391626
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका - मुख्यमंत्री आक्रमक

  Team Jeevandeep      26/08/2024      mahatvachya-batmya    Share


मुंबई गोवा महामार्गाचं काम अर्ध्यावर सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

रायगड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित आहेत. काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याची दुरावस्था पाहिल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरुन आदेश दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या महामार्गाची पाहणी करत आहेत. महामार्गाची कामं युद्धपातळीवर करा, असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. कामं सोडून गेलेल्या कंत्राटदारांना टर्मिनेटच करु नका तर काळ्या यादीत टाका. डिबार करुन टाका, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

कंत्राटदारांवर 302 प्रमाणं गुन्हा दाखल करा, इथं माणसं मरत आहेत, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी केला. कंत्राटदाराला नुसतं टर्मिनेट आणि दंड करुन उपयोग नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन लावणार आहे. जे कंत्राटदार कामं सोडून पळून गेले आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जे लोक कामं सोडून पळाले आहेत त्यांच्यामुळं माणसं मेली आहेत. कंत्राटदारांवर उद्या एफआयआर झाला पाहिजे. मला मोबाईलवर एफआयर पाठवायची, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. 

जे कंत्राटदार काम सोडून पळाले त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून उपयोग नाही. त्यांच्यामुळं माणसं मेली आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे  आदेश एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना  दिले. एकालाही सोडायचं नाही, उचलून आणा जेलमध्ये टाका,लोकं एवढे मेलेत त्याला हे जबाबदार आहेत. मला याचं रिपोर्टिंग करा, असं  एकनाथ शिंदे म्हणाले. जेलमध्ये टाकल्याशिवाय यांना धडा मिळणार नाही. ही मोगलाई आहे का? मेसेज एवढा कडक गेला पाहिजे, परत कोणी काम सोडणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी पळस्पे फाटा येथून मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा हायवेच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आमदार भरत गोगावले देखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. 

+