team jeevandeep 27/12/2024 mahatvachya-batmya Share
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्समध्ये ९२ व्या वर्षी निधन झाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांना भारतात केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे त्यांना आदराचे स्थान होते. माजी पंतप्रधानांच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. १९३२ मध्ये पाकिस्तानातील पंजाबमध्ये जन्मलेले मनमोहन सिंग २००४ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदा पंतप्राधान झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आदरांजली वाहिली. सिंग यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल उपस्थित होते.