Visitors: 228100
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

ठाणे जिल्ह्याला मेट्रोची आणखी काही वर्षे प्रतीक्षा, कल्याण-तळोजा मेट्रोचे काम तीन टक्केच

  team jeevandeep      13/03/2025      mahatvachya-batmya    Share


ठाणे :

ठाणे जिल्ह्यातील शहरे एकमेकांना जोडण्यासाठी गेल्या सहा ते सात वर्षांपासून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे जेमतेम ३ टक्के इतकीच झाले असून वडाळा ते कासारवडवली मेट्रोसाठी दोन वर्ष तर, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसाठी चार वर्षे नागरिकांना वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील रस्ते तसेच रेल्वे वाहतूकीवरील प्रवाशांचा भार कमी व्हावा तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी नवा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून राज्य सरकारने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मेट्रो प्रकल्पाचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला. या नुसार, ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची घोषणा करण्यात आली असून या सर्व प्रकल्पांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहेत. मेट्रोच्या माध्यमातून जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, मिरारोड यासह तळोजा परिसर एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. परंतु या सर्व प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली असून यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी काही वर्षे मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

+