team jeevandeep 19/03/2025 mahatvachya-batmya Share
कल्याण :
उल्हासनदीतील जलपर्णी काढण्याचे काम ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीने सुरू केले आहे, परंतु ज्या महानगरपालिका, एमआयडीसी, नगरपरिषदा, नगरपंचायती या पाण्यावर करोडो रुपये कमवतात, पाणीपट्टी द्वारे वसूल करतात, त्यांचे नक्की काय काम?शिवाय, पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, काय करते?असा सवाल या गावातील ग्रामस्थ विचारत आहेत,
५०ते६०लाख नागरिक उल्हासनदी च्या पाण्यावर अवलंबून आहेत,कर्जत, लोणावळा च्या राजमाची ठिकाणाहून ही नदी उगम पावते, पुढे, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण असा १५०किमी चा प्रवास करून खाडीला मिळते, परंतु या नदीत कर्जत, बदलापूर, हेंद्याचा पाडा, रायते, म्हारळचा नाला असे दूषित सांडपाणी नदीत सोडले जाते, या नदीतून, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर पालिका, बदलापूर नगरपरिषद, अंबरनाथ नगरपंचायत, एमआयडीसी, अनेक खाजगी संस्था, संघटना, फार्महाऊस, पाणी उचलतात, बक्कळ पैसा कमवतात, परंतु नदी स्वच्छतेचा प्रश्न आल्यावर मात्र हे गायब होतात,
सध्या उल्हास नदीचे पात्र हे जलपर्णी या वनस्पतींने व्यापले आहे, ती काढणे, नष्ट करणे हे खूपच खर्चिक आहे, यापूर्वी ही यावर शासनाने लाखों रुपये खर्च केला होता. पण तो पाण्यात गेला. मात्र ठाणे जिल्हा परिषदेने आपली जबाबदारी इतरांप्रमाणे झटकली नाही. कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा, मानिवली, आपटी मांजर्ली, वसत शेलवली, रायते, आणे भिसोळ या ग्रामपंचायतीपैकी कांबा, म्हारळ, वरप यांनी आपल्या कुवतीप्रमाणे ही जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. तर मानिवली, रायते, आपटी, वसत,आणे भिसोळ, या अत्यल्प उत्पन्नाच्या ग्रामपंचायतीना हे शक्य नाही, या सर्वच ग्रामपंचायतीना दिड ते दोन किलोमीटर पेक्षा जास्त नदी किनारा असल्याने ते जलपर्णी कशी काढणार?ऐवढा निधी कसा मिळणार?ऐवढे मनुष्यबळ कोठून आणणार?असे शेकडो प्रश्न या ग्रामस्थांना पडले आहेत, विशेष म्हणजे ज्यांच्याकडे निधी भरपूर आहे, मनुष्यबळ आहे, पैसा कमवतात?ते हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन गप्प बसले आहेत, आणि यांच्या कडे ना निधी, ना मनुष्यबळ अशा ग्रामपंचायती मात्र 'खारीचा वाटा, समजून जलपर्णी काढत आहे, त्यामुळे 'कोणाच्याखांद्यावर, कोणाचे ओझे, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे