team jeevandeep 06/04/2025 mahatvachya-batmya Share
कल्याण :
प्रभू श्रीराम नवमी निमित्त दिव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिवा स्टेशन बाहेर भव्य प्रभू श्रीराम मूर्ती उभारली असून त्याची पूजा करून प्रभू श्रीरामाचा पाळणा देखील गायला. यावेळी भावीकांनी, दिवेकरांनी पूजा आणि आरतीसाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, महिला उपशहर संघटिका मयुरी पोरजी यांनी केले होते. यावेळी ठाकरे गटाच्या महिला विभाग संघटिका राजश्री मुंडे, विभाग प्रमुख शनिदास पाटील, संजय जाधव, उप विभाग प्रमुख योगेश निकम, संदीप राऊत, सुहासिनी गुळेकर, कल्पिता मुंडे, संजय अरदालकर, राजेश गोफने, धनाजी पवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थितीत होते.