team jeevandeep 06/04/2025 mahatvachya-batmya Share
अभिनयाच्या विविध कंगोऱ्यातून अंगीकारलेल्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांच्या केवळ पसंतीसच नव्हे तर लक्षवेधी अशी भूमिका साकारून आनंद देणारे अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे अकस्मात जाणं मनाला चटका लावून गेलं.
जीव ओतून काम करण्याची हातोटी, दमदार आवाजातील वैशिष्ट्यपूर्ण स्वच्छ, सुस्पष्ट, पहाडी संवादफेक, सहज, सुंदर, नैसर्गिक मुद्राभिनय ही त्यांची खास आयुधं होती.
डॉक्टरांनी सुमारे सदुसष्ट मराठी नाटके, एकशे दहा अधिक चित्रपट, एकशे चाळीस मालिका साकारत हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप तेवढ्यात ताकदीने उमटवली. चार दिवस सासूचे, दामिनी, वादळवाट आदी अनेक मालिकां, नाटक, चित्रपटांमधून महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत त्यांनी आपल्या अभिनयाचे विविधांगी कंगोरे पेश करून जो आनंद दिला तो कायम रसिक मनावर राहणार आहे. अनोखी अभिनय शैली आणि संवाद पैकीच्या बळावर कलाक्षेत्रात वेगवेगळे स्थान निर्माण करणारे डॉक्टर विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.