Visitors: 226409
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

कामगार दिनाच्या दिवशीही कामगारांना सुट्टी न देता जबरदस्तीने करून घेतले काम ! म न से, सह महाराष्ट्र मजदुर संघ स्थानिक कामगारांसाठी मैदानात !

  team jeevandeep      08/05/2025      mahatvachya-batmya    Share


मुरबाड मधील औद्योगिक कंपनी व्यवस्थापनाचा मुजोरपणा !

म न से, सह महाराष्ट्र मजदुर संघ स्थानिक कामगारांसाठी मैदानात !

मुरबाड-प्रतिनिधी : 

मुरबाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या छोट्या -मोठ्या अनेक कंपन्या असून, बहुसंख्य कंपन्या या शासनाच्या नियमानुसार चालतात.त्यांना शासनाने घालून दिलेले निर्बंध, व नियमानुसार त्यांचा कारभार चालत असतो, मात्र याच औद्योगिक क्षेत्रात असलेली क्रिपाशक्ती बेकर्स, परमेश्वर बेकर्स व पार्ले बिस्कीट कंपनी हि शासनाचे नियम धाब्यावर बसुन चालत असुन, येथे प्रामुख्याने कामगार वर्ग हा येथील बहुतांश गोरगरीब,गरजु, निराधार, पिडीत महिला या ठिकाणी काम करत असल्याने येथील मॅनेजमेंट हि जाणुन बुजुन या महिलांवर सातत्याने अन्याय अत्याचार करत आहेत .त्यांच्या कडून आठ तास ड्युटी ऐवजी दहा दहा तास ,बारा तास, जबरदस्तीने ड्युटी करून घेत असुन नुकताच पार पडलेला 1मे हा कामगारांच्या हक्काचा दिवस,हा कामगार दिन, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनातुन  साजरा केला जातो.किमान या दिवशी तरी येथील कामगारांना भर पगारी सुट्टी मिळणे आवश्यक असताना, येथील व्यवस्थापनाने जोर जबरदस्तीने येथील महिला कामगारांना कामावर न आल्यास कामावरून काढु अशी धमकी देऊन, त्यांना  कामगार दिनाच्या दिवशीही वेठबिगाराप्रमाणे राबविण्यात आले.याशिवाय या कामगारांना वर्ष भरात येणाऱ्या कुठल्याच प्रकारच्या सणासुदीच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळत नाही . एरव्ही कधी  सुट्टी घेतल्यास,युनियनबाजी  केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते.तसेच आठतासा ऐवजी दहा, बारा तास ड्युटी करून घेतली जाते.त्याच्या मोबदल्यात कुठल्याही प्रकारचे किमान वेतन न देता,मोघमपणे अडीच तिनशे रुपये देवून त्यांची बोलवण केली जात आहे.तर त्या व्यतिरीक्त कुठल्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत.ना सी.एल,एस.एल.ना पी.एल.ना घरभाडे,ना बोनस,ना युनिफॉर्म,ना शेट्टी किट,दिले जात.याशिवाय या कंपन्या मध्ये एकही मराठी किंवा महाराष्ट्रीयन पुरुष कामगार नसुन, सर्व परप्रांतीय पुरुष,व फक्त मराठी महिला वर्ग येथे आपल्या मंजुरी मुळे हव्या तशा पद्धतीने राबविला जातो. प्रशासन या पिडीत , अन्याय, अत्याचार ग्रस्त महिलांना न्याय देईल काय ?अशी मागणी महाराष्ट्र मजदुर संघाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस मा.श्री.मंगलजी डोंगरे यांनी केली आहे.तसेच लवकरच कामगार उपायुक्त यांची भेट घेऊन या पारले कंपनीला धडा शिकवला जाईल.तर दुसरीकडे परमेश्वर बेकर्स या पार्ले बिस्कीट बनविणा-या कंपनी मध्ये हि असाच प्रकार सुरु असताना मनसेचे मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी अचानक या कंपनीला भेट दिली असता.त्या कंपनीचा ही मुजोरपणा नजरेसमोर आला असून,तिथला कामगार वर्ग काकुळतीला येऊन सुद्धा तिथल्या मुजोर व्यवस्थापनानी कामगार दिनाचे कुठलेही सोयरसुतक न ठेवता.कामगाराना ड्युटी करण्यास भाग पाडल्याचे दिसून आले.त्यानंतर मनसे स्टाईलने व्यवस्थापला जबाब देऊ म्हटल्यावर तिथल्या मॅनेजरने समजुतीने कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे कबूल केले.तर या ठिकाणी काम करणाऱ्या पिडीत, शोषित, महिलांना न्याय देण्यासाठी मुरबाड मनसे व महाराष्ट्र मजदुर संघ आता मैदानात उतरणार हि काळ्या दगडावरची रेष असल्याचे या पार्ले ग्रुप ऑफ कंपनीला सांगण्यात आल्याने कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे.

+