Visitors: 228644
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

कल्याण-कसारा-कर्जत संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काळ्या फीत लावून निषेध व्यक्त आंदोलन!

  Team jeevandeep      22/08/2024      mahatvachya-batmya    Share


शहापूर ग्रामिण : उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था(महासंघ) संलग्न कल्याण - कसारा रेल पेसेंजर असोसिएशनचे कल्याण-कसारा-कर्जत संघटनेच्या वतीने येथील आसनगाव रेल्वेस्थानकात विविध मागण्यांसाठी सफेद कपडे व काळ्या फीत लावून निषेध व्यक्त आंदोलन करण्यात आले.

      आसनगाव रेल्वेस्थानकातील तसेच कल्याण -कसारा रेल्वे मार्गावर असलेल्या विविध समस्या सोडविण्यासाठी कल्याण-कसारा-कर्जत संघटनेच्या वतीने सफेद कपडे व काळ्या फिती लावून निषेध व्यक्त आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो रेल्वे प्रवाशांनी स्वतः काळी फीत लावून निषेध नोंदविला .

     या निषेध आंदोलना प्रसंगी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आसनगाव रेल्वेस्थानक येथे भेट देली व रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करत प्रवासी संघटनेच्या निषेध आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.  यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे जितेंद्र विशे, उद्योजक रविशेठ पाटील, संघटनेचे पदाधिकारी, रेल्वे पोलीस- प्रशासन, शहापूर पोलीस प्रशासन, कर्मचारी व  रेल्वे प्रवासी उपस्थित होते.

+