Visitors: 228165
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आजमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मागणी

  team jeevandeep      04/03/2025      mahatvachya-batmya    Share


मुंबई, दि. ४:

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करतो. अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली.

याबाबत निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. अबु आजमीसारखी माणसं शरीरानं भारतात राहात असली तरी मनानं मोगलाईतच जगत आहेत. त्यांना देशाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी कसलंही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. औरंगजेब क्रुरकर्मा होता. तो कसला उत्तम प्रशासक. अशा राक्षसांची भलामण करणाऱ्या पिलावळीचा आम्ही धिक्कार करतो.

अबू आजमीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी करीत उपमख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अबु आजमिंनी कितीही माजोरडी विधानं केलीत तरी त्याने इतिहास बदलणार नाही. कारण हा इतिहास मराठ्यांच्या शौर्याचा आहे. पराक्रमाचा आहे.

नऊ वर्षात ६९ लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते. उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा असे सांगत “देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था,महा पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था” या ओळीने उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला.

+