Visitors: 228098
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने, शिवसेना शिष्टमंडळाचा पालघर जिल्ह्यात एस.टी. डेपो परिसर पाहणी दौरा

  team jeevandeep      07/03/2025      mahatvachya-batmya    Share


पालघर  :"वसई आगर दौरा संपन्न"

दै.ठाणे जीवनदीप वार्ता    वसई / शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व डेपो आगार परिसराची पाहणी दौरा शिवसेना महिला आघाडी करत आहे. या अनुशंगाने  शिवसेना पालघर लोकसभा संपर्कप्रमुख भारती गावकर, जिल्हा सचिव अतुल पाटील आणि विधानसभा संघटक  प्रथमेश बांदेकर यांच्या उपस्थितीत, पालघर जिल्ह्यातील वसई बस आगारातील आगार व्यवस्थापक स्वप्नील आहेर यांची भेट घेऊन महिला सुरक्षतेबाबत आगार परिसरात पाहणी केली.

          त्यावेळी त्यांच्या बरोबर वसई तालुका संघटक   अश्विनी चव्हाण, वसई तालुका उपप्रमुख  राहुल कांबळे, माजी उपजिल्हासंघटक, मनाली चौधरी, वसई तालुका उप संघटक , अर्पिता पडवळ, वसई शहर संघटक पद्मा जाधव, मंगला मुंढे, चेतना जाधव, उपशहरप्रमुख चंद्रकांत कोलते, विद्या गौळ पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

+