team jeevandeep 07/05/2025 mahatvachya-batmya Share
महापालिका आयुक्त मा. श्री. अभिनव गोयल यांनी दिनांक ०७ मे २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयाला अचानक भेट दिली. रुग्णालयातील रुग्णालयांच्या चेअर वर बसून रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांनी मिळणाऱ्या सेवा, औषधसाठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला.
दौऱ्यात आयुक्तांच्या निदर्शनास आले की, ओपीडीची ठरलेल्या वेळेत सुरु झालेली नव्हती. याबाबत त्यांनी कडक नाराजी व्यक्त करत खालील स्पष्ट निर्देश दिले:
आयुक्तांचे निर्देश:
1. ओपीडी वेळापत्रक आयुक्तांच्या मंजुरीनंतर प्रसिद्ध करावे.
2. सर्व डॉक्टरांनी विहीत वेळेच्या किमान ५ मिनिटे अगोदर ओपीडीमध्ये उपस्थित राहावे.3. डॉक्टर अनुपस्थित असल्याचे दिसून आले. याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश.
इतर महत्त्वाचे निर्देश:
* सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीनुसार अदा करावे.
* फार्मासिस्ट अनुपस्थित होता; याबाबत चौकशी करून अहवाल सादर करावा.
* औषध साठ्यावर संगणक प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवावे, औषधे उपलब्ध नसल्यास जबाबदारी निश्चित करावी.
* फार्मासिस्ट अनुभवी नसल्याची बाब निदर्शनास; नागरिकांना योग्य सेवा मिळावी म्हणून अनुभवी कर्मचारी नियुक्त करावेत.
* डॉक्टर/कर्मचारी वेळेत उपस्थित राहण्यासाठी आदेश निर्गमित करावेत; साप्ताहिक अचानक तपासणी करून अहवाल सादर करावा.
* स्त्रीरोग तज्ञांची ओपीडी सेवा त्वरित सुरु करावी.
* प्रसूती सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
* सुविधा अधिक दर्जेदार व्हाव्यात, रुग्णांशी सौजन्यपूर्ण वर्तन करावे.
* रुग्णालय बाहेरील कचरा व बॅनर तत्काळ हटवावे.
* रुग्णवाहिका दुरुस्त करून देखभाल नियमित करावी. वाहनचालक सेवा टाळल्यास कारवाईचे प्रस्ताव सादर करावेत.
महापालिका आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापनाला बजावले की, शिस्त, पारदर्शकता आणि दर्जेदार रुग्णसेवा हीच प्राथमिकता असली पाहिजे.