Visitors: 228133
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

बदलापूर घटनेनं सरकारला खडबडून जाग

  Team Jeevandeep      21/08/2024      lekh    Share


  • बदलापूर घटनेनं सरकारला खडबडून जाग
  • राज्यात शिपाई ते मुख्याध्यापक पोलीस पडताळणी होणार !!

ठाणे : बदलापूर  लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याची परिणती उग्र आंदोलनात झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी आरोपी अक्षय शिंदे याला  कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याला  26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थींनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन निर्णय जारी झाली आहे. 

 

  • काय आहे शासन निर्णय?
  1. शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक
  2. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश
  3. सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूलबसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक
  4. शाळांमध्ये तक्रार पेटींचा देखील प्रभावीपणे वापर व्हावा
  5. सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन 
  6. शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन पुढील एका आठवड्यात करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश 
  7. राज्यस्तरीय सुरक्षा आढावा समितीचे देखील गठन करण्यात आले असून अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असणार
  8. सोबत आणखी सहा सदस्य समितीत असणार 
  9.  
  10. शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापनाने तो न दडवता शिक्षणाधिकाऱ्यांना सांगावा अन्यथा कारवाई आदेश
+