Visitors: 226559
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून घेतला असा निर्णय

  team jeevandeep      22/02/2025      krida    Share


वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील आठवा सामना युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. युपी वॉरियर्स या स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी आतुर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स अंतिम फेरीच्या दृष्टीने तयारी करत आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला.

WPL 2025 UPW vs DC : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून घेतला असा निर्णय, कर्णधार मेग लेनिंग म्हणाली..

 वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील आठवा सामना युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे.  दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंग म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करून. तीच टीम घेऊन उतरणार आहोत . आम्हाला वाटते की आम्ही गेल्या सामन्यात सुधारणा केली आणि आज रात्रीही तेच करण्याचा विचार करत आहोत. खेळपट्टी आमच्या खेळाला अनुकूल असेल असे वाटते. विजयी बाजूने परत आल्याने आनंद झाला. आज रात्री पुन्हा चांगले खेळायचे आहे. ‘दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखालील संघाची चिंता स्पष्ट आहे की, दोन सामने गमवून सध्या गुणतालिकेत तळाशी आहेत. दिल्ली कॅपिटल्सने तीन सामन्यांपैकी दोन विजय मिळवले असले तरी त्यांनी सर्वोत्तम प्रदर्शन केलेले नाही. मुंबई विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर कसा बसा विजय मिळाला. पुढील पाच सामन्यांपैकी चार बेंगळुरूमध्ये होणार असल्याने सलग तिसऱ्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या प्रयत्नात असतील.

+