Visitors: 226359
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

आरसीबी आणि केकेआर यांच्या सामन्यावर पावसाचे सावट

  Team jeevandeep       17/05/2025      krida    Share


ipl 

बंगळूरूमध्ये होणाऱ्या RCB आणि KKR यांच्यातील सामन्यापासून IPL 2025 चा हंगाम पुन्हा सुरू केला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. KKR साठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

बेंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. पण हवामानामुळे सामना वेळेवर सुरु होईल की नाही, याबद्दल शंका आहे. "17 मे रोजी बंगळुरूत गडद ढग असणार आहेतत. शहरात सायंकाळच्या वेळी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे," असे हवामान विभागाने म्हटले आहे.गेल्या काही दिवसांपासून बेंगळूरु आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारी 1 वाजता 25% पावसाची शक्यता आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही शक्यता 58% पर्यंत वाढेल. सामन्याच्या वेळी, म्हणजे सायंकाळी 7 वाजता, पावसाची शक्यता 71% पर्यंत आहे.

चिंताजनक बाब म्हणजे, सायंकाळी 7 वाजता टॉस होणार आहे. पण दिलासादायक गोष्ट अशी आहे की, रात्री उशिरा पावसाची शक्यता कमी होत जाईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रात्री 9 वाजता पावसाची शक्यता 49% आणि त्यानंतर 34% आहे.एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मैदानावरील पाणी लवकर ड्रेन करण्याची सोय आहे. त्यामुळे पावसामुळे व्यत्यय आला, तरी षटकांची संख्या कमी करून रात्री 10 वाजेपर्यंत सामना सुरू होऊ शकतो.

विराटसाठी सोशल मीडियावर अनोखी मोहिम

विराटच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर एक मोहिम सुरू आहे. यानुसार, या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचे फॅन्सनी उपस्थित राहावे. त्यांनी विराटची कसोटी क्रिकेटची जर्सी परिधान करावी. अशाप्रकारचे आवाहन मोहिमेद्वारे केले जात आहे.

आज होणार सामना केकेआरसाठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिकंणे आवश्यक आहे. तर आरसीबी हा सामना जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाऊ शकते.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना गुण वाटून मिळतील.

+