team jeevandeep 29/04/2025 krida Share
सोमवारी (२८ एप्रिल) :
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला. यावेळी पद्म पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. पद्म पुरस्कार हे भारतरत्न पुरस्कारानंतरचे भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत.
पद्मश्री हा चौथा सर्वोच्च, पद्म भूषण हा तिसरा सर्वोच्च, तर पद्म विभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यंदा भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन आणि दोनवेळचा ऑलिम्पिक पदकविजेता हॉकीपटू पीआर श्रीजेश यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले होते. हे दोघेही या पुरस्कारासाठी सोमवारी राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.