team jeevandeep 13/03/2025 krida Share
Rohit Sharma Reirement: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता. पण रोहितने निवृत्ती घेणार नसल्याचे सांगत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला. यानंतर आता एबी डिव्हिलियर्सने मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने वर्षभराच्या कालावधीत दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा वनडेमधूनही निवृत्ती घेणार अशा जोरदार चर्चा सुरू होत्या. पण रोहित शर्माने विजयानंतर मी या फॉरमॅटमधून निवृत्त होत नसल्याचे रोहित शर्माने स्पष्ट केले. पण भविष्यातील त्याच्या प्लॅनबाबत त्याने मौन ठेवले आहे. पण तरीही रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत माजी खेळाडूंना सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. यावर एबी डिव्हिलियर्सने उत्तर दिले आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनी वेग धरण्यामागचं कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माबाबत एक रिपोर्ट समोर आला होता. या रिपोर्टनुसार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्याबाबत योजनांची माहिती द्यावी असे बोर्डाने सांगितले होते, जेणेकरून त्या दृष्टीने संघबांधणी करता येईल. पण रोहितने निवृत्तीच्या चर्चांना नकार दिला असला तरी तो २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, याबाबत त्याने माहिती दिलेली नाही. कारण तोपर्यंत रोहित शर्मा ३९ वर्षांचा आहे.