team jeevandeep 22/02/2025 krida Share
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील आठवा सामना युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंग म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करून. तीच टीम घेऊन उतरणार आहोत . आम्हाला वाटते की आम्ही गेल्या सामन्यात सुधारणा केली आणि आज रात्रीही तेच करण्याचा विचार करत आहोत. खेळपट्टी आमच्या खेळाला अनुकूल असेल असे वाटते. विजयी बाजूने परत आल्याने आनंद झाला. आज रात्री पुन्हा चांगले खेळायचे आहे. ‘दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखालील संघाची चिंता स्पष्ट आहे की, दोन सामने गमवून सध्या गुणतालिकेत तळाशी आहेत. दिल्ली कॅपिटल्सने तीन सामन्यांपैकी दोन विजय मिळवले असले तरी त्यांनी सर्वोत्तम प्रदर्शन केलेले नाही. मुंबई विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर कसा बसा विजय मिळाला. पुढील पाच सामन्यांपैकी चार बेंगळुरूमध्ये होणार असल्याने सलग तिसऱ्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या प्रयत्नात असतील.