team jeevandeep 17/03/2025 Crime Stories Share
अहिल्यानगर :
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरील चोरलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी अहिल्यानगरकडे येत असलेल्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करत अटक केली. त्यांच्याकडून २४ लाख ९४ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सुयोग अशोक दवंगे (वय २१, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), संदीप किसन साबळे (वय २३, रा. पाचपट्टावाडी, ता. अकोले), संदीप निवृत्ती गोडे (वय २३, रा. सोमठाणे, ता. अकोले), अनिकेत अनिल कदम, (वय २१, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे), दीपक विलास पाटेकर (वय २४, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे), सचिन दामोदर मंडलिक (वय २९, रा. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.