Visitors: 226310
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजाऱ्यांशी झालेल्या वादात 19 वर्षीय मुलीचा मृत्यू

  team jeevandeep      06/05/2025      Crime Stories    Share


कल्याण :

कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर परिसरातील घटना

घरात घुसून दारूसाठी पैसे न देणाऱ्या इसमासह पत्नी मुलीला लाकडी दांडक्याने केली मारहाण

महात्मा फुले पोलीसांनी केली  बाप लेकासह 5 जणांना अटक

कल्याण : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजाऱ्यांशी वाद घातला, इतकेच नव्हे तर संतापलेल्या बाप लेकाने आपल्या साथीदारांसह दारूचे पैसे न देणाऱ्या इसमासह त्याची पत्नी, 19 वर्षीय मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात 19 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून  सानिया सय्यद असे मयत मुलीचे नाव आहे. कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुलाम शेख, उर्फ मुन्ना शेख, त्याचा मुलगा अब्दुल शेख, आणि त्याचे सहकारी  शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख, या पाच जणांना अटक केली आहे.

कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद हे आपल्या पत्नी व मुलीसह राहतात. निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.  सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नीसार घरी जेवत असताना याच परिसरात राहणारा गुलाम शेख, हा त्यांच्या घरी आला. त्याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले असता निसार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून गुलाम यांचा मुलगा अब्दुल शेख, त्याचा मित्र शोएब शेख, अजित शेख  व शाहीर शेख, यांनी निसार यांच्या घरात घुसून निसार यांना बेदम मारहाण केली यावेळी निसार यांचे पत्नी झुलेखा व मुलगी सानिया या दोघी निसार याना सोडवण्याकरीता आल्या असता या दोघींना देखील त्यांनी धक्काबुक्की केली.

 या दरम्यान अब्दुल याने त्यांची मुलगी सानियावर लाकडी दांडक्याने हल्ला केला या हल्ल्यात सानिया हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख, त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी  शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख या पाच जणांना अटक केली आहे. 

+