team jeevandeep 28/02/2025 Crime Stories Share
विमानतळ सर्विस रोड वरून वहाळ गावाकडे येणाऱ्या खाडीवरील पुलावर अनोळखी इसमाचा मृतदेह पोलीसांना आढळला होता. त्यानुसार उलवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्यासाठी चौकशी सुरू केली होती. त्या दरम्यान रेश्मा सचिन मोरे आणि तिचा मुलगा हे तिचा पती सचिन मोरे हा कालपासून मिसिंग असल्याबाबतची तक्रार देण्यास पोलीस ठाण्यास आले होते. त्यावेळी तिला अनोळखी मयत इसमाचे फोटो दाखविल्याने तिने ते फोटो पाहून तो तिचा पती सचिन मोरे असल्याचे ओळखले. या महिलेकडे महिलेकडे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी सविस्तर चौकशी केली असता ती असमाधानकारक आणि संदिग्ध उत्तर देत असल्याने तिच्यावर संशय आला. त्यामुळे तिच्या मोबाईलचे सीडीआर त्यांच्या राहत्या घराचे बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मृतदेहाच्या शिवविच्छेदन अहवाल यावरून मृत इसमाचा नाक आणि तोंड दाबून खून झाल्याबाबत खात्री झाल्याने खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पुढील तपास केला असता रेश्मा मोरे यांनी तिचा पती सचिन मोरे याच्याकडून मानसिक आणि शारीरीक त्रास देत असल्याने त्यास घटस्फोट देण्यास सांगितले होते. परंतु पतीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने त्यांनी पतीला जिवे ठार मारण्याचे ठरविले. रेश्मा सचिन मोरे (३५ वर्ष) हिने मुलगा (१६ वर्ष) तिचा मित्र रोहित टेमकर आणि रिक्षा चालक प्रथमेश म्हात्रे यांच्या मदतीने कट रचून रोहित टेमकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या नशेच्या गोळ्ळ्या सचिन मोरेला कारल्याच्या ज्यूस मध्ये टाकून प्यायला दिल्या. सचिन मोरे नशेच्या गुंगीमध्ये असताना त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने आरोपी रिक्षाचालक प्रथमेश म्हात्रेच्या रिक्षामध्ये पत्नी, मुलगा आणि सचिन मोरे हे रिक्षात बसून शगुन चौक, उलवे, डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ, कळंबोली, एमजीएम हॉस्पिटल कामोठे, उरण, जेएनपीटी परिसर इत्यादी भागात फिरवून