team jeevandeep 02/05/2025 Crime Stories Share
नाशिक :
नाशिकमध्ये 1 मे रोजी रितेश डोईफोडे नावाच्या युवकाची हल्लेखोरांनी हत्या केली. तर त्याच्या जखमी मित्रांवर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे, आरोपी स्वत: पोलिसांना शरण गेला.
राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ निर्माण होत आहे. 1 मे रोजी रितेश डोईफोडे नावाच्या युवकाची हल्लेखोरांनी हत्या केली. ही हत्या नाशिकरोड परिसरात झाली आहे. या हत्येचे कारण आता समोर आले आहे. ही हत्या पूर्ववैमन्यस्यातून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हत्या करणारा गुन्हेगार स्वत:हून पोलिसांना शरण गेला आहे. या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.