team jeevandeep 07/05/2025 chitravarta Share

इव्हेंटमध्ये कियारा तिच्या खास लूकबद्दल म्हणाली, ''एक कलाकार आणि आई होणारी महिला म्हणून, हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. मेट गालासारख्या व्यासपीठावर या खास टप्प्याचे चित्रण करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनीही त्यांच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकीकडे प्रियांका पांढऱ्या आणि काळ्या पोल्का डॉट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती तर दुसरीकडे निक पांढऱ्या शर्ट आणि काळ्या ट्राउझर्समध्ये देखणा दिसत होता.
