team jeevandeep 07/03/2025 chitravarta Share
कतरिना कैफच्या करिअरच्या सुरुवातीला तिला संघर्षाचा सामना करावा लागला. तिला 'साया' चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले होते. या अपमानासारख्या घटनेने तिला प्रेरणा दिली आणि आज ती बॉलिवूडमध्ये मोठी सुपरस्टार आहे. तिच्या कथेतून कोणालाही संघर्षातून यशस्वी होण्याची प्रेरणा मिळते.
मुंबई:
आज बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी कतरिना कैफ कधी एकेकाळी संघर्ष करत होती, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक अपमान सहन करावे लागले, ऑडिशन्समध्ये नकार पचवावे लागले आणि काही प्रोजेक्टमधून तर अचानक काढूनही टाकले गेले. त्यातीलच एक मोठा धक्का म्हणजे अनुराग बसुच्या २००३ च्या ‘साया’ चित्रपटातून तिला केवळ एका शॉटनंतरच रिप्लेस करण्यात आलं. आज ती इंडस्ट्रीतील मोठ्या अभिनेत्रींपैकी एक असली तरी, सुरुवातीचा हा कटू अनुभव तिने अजूनही लक्षात ठेवला आहे.
या संदर्भातील कतरिना एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जिथे तिने स्वतः सांगितलं होतं की 'साया’च्या सेटवर एकच शॉट दिल्यानंतर तिला रिप्लेस करण्यात आलं. या चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता, पण कटरीनाच्या जागी नंतर तारा शर्मा ला कास्ट करण्यात आलं. ती सांगते, "जेव्हा मी करिअरची सुरुवात केली, तेव्हा अनेकांनी माझ्या तोंडावर सांगितलं होतं की मी कधीच अभिनेत्री बनू शकत नाही आणि माझ्यात काहीही चांगलं नाही"
हा अपमान सहन करणं सोपं नव्हतं. कतरिना कबूल केलं की तेव्हा ती खूप रडली, पण तिने हार मानली नाही. "रडल्याने थोडं हलकं वाटतं, पण शेवटी तुम्हाला तुमच्या ध्येयावर ठाम राहावं लागतं. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जाऊ शकता."
‘साया’ हा चित्रपट २००२ मध्ये आलेल्या हॉलीवूड चित्रपट ‘Dragonfly’ वर आधारित होता. अनुराग बसु यांनी दिग्दर्शन केलेल्या आणि महेश भट्ट यांनी निर्मिती केलेल्या या सिनेमात महिमा चौधरी, झोहरा सहगल आणि राजेंद्रनाथ Zutshi यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.