Visitors: 390120
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

उशिरा जेवल्यास वाढतो वजन आणि फॅट

  team jeevandeep      08/05/2025      arogya    Share


 आजकालच्या धावपळीच्या जीवनात ऑफिस, शाळा, कामाचे दबाव आणि इतर कामांचा व्याप एवढा असतो की अनेकांना आपल्या बिझी लाईफस्टाईलमुळे रात्री उशिरा जेवण करावं लागते. याचा परिमाण आपल्या आरोग्यावर होतो, जसे की गॅस, पोटात दुखणे, डोकं दुखणे, पित्त यासारख्या समस्या. यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढणे.

एकदा वजन वाढायला सुरुवात झाली की अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आपण नको ते उपाय करत असतो, पण त्याचे विशेष परिणाम दिसत नाहीत. मग, यावर काय करावं? अनेकजण विचार करत असतात. पण जर रात्रीची जेवणाची वेळ बदलली तर सर्व गोष्टी सुधारू शकतात, असे एका संशोधनात समोर आले आहे. तर चला, जाणून घेऊया रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आहे.

कधी करावं जेवण ?

आरोग्यशास्त्रज्ञांच्या मते, रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत जेवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उशिरा जेवण केल्यामुळे शरीराला आराम करण्याची योग्य वेळ मिळत नाही, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्या होऊ शकतात.

जेवणाचा योग्य वेळ

रात्री 7 वाजेपर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न करा. हे शरीराला पचनाची प्रक्रिया योग्य रितीने पार करण्यासाठी पुरेसा वेळ देईल.

हलका आहार

जेवण हलका, पचायला सोप्पा असावा. उदाहरणार्थ, सूप, सलाड, उकडलेली भाजी किंवा डाळ- भाट हे सर्वोत्तम पर्याय असू शकतात.

झोपेपूर्वी अंतर

जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तासांचा अंतर ठेवा. यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होईल आणि आरामदायक झोप मिळवता येईल.

+